कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » Uncategorized » पत्रकारितेतील योगदानाचा गौरव; ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव (आबासाहेब) यांचा ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन महाराष्ट्र, राज्य यांच्यावतीने आदर्श कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

पत्रकारितेतील योगदानाचा गौरव; ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव (आबासाहेब) यांचा ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन महाराष्ट्र, राज्य यांच्यावतीने आदर्श कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

पत्रकारितेतील योगदानाचा गौरव; ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव (आबासाहेब) यांचा ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन महाराष्ट्र, राज्य यांच्यावतीने आदर्श कार्य गौरव पुरस्काराने सन्मान

सातारा -ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार आणि अजिंक्यतारा साखर कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख महेंद्र जाधव (आबासाहेब) यांना ‘आदर्श कार्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेंद्रे येथील स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनातील व्यवस्थापकीय कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

प्रगती हिंदुस्तानचे’ सहसंपादक विनोद गायकवाड आणि कराडचे पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते महेंद्र जाधव यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अजिंक्यतारा कामगार पतसंस्थेचे व्यवस्थापक संभाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

महेंद्र जाधव यांच्या पत्रकारितेतील समाजप्रबोधनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.

आज ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनने माझा जो सन्मान केला, तो केवळ माझा नसून मी आजवर प्रामाणिकपणे केलेल्या पत्रकारितेचा आणि मूल्यांचा सन्मान आहे. स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज आणि ना.श्री. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा महाराजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना समाजसेवेची जी शिकवण मिळाली, तीच मी माझ्या लेखणीतून उतरवली. ​पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नसून समाजप्रबोधनाचे एक प्रभावी साधन आहे. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जबाबदारीने आणि निष्ठेने काम करण्याची प्रेरणा देणारा ठरेल. मला या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघ व भुईंज प्रेस क्लब यांचे मी मनापासून आभार मानतो.” अशी कृतार्थ भावना पुरस्कारार्थी महेंद्रआबा जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket