Home » राज्य » कुसुंबी गणात साधू चिकणे यांचा दरारा कायम; प्रस्थापित दिग्गजांना बदलावी लागली तिकीट, वैशालीताई साधू चिकणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कुसुंबी गणात साधू चिकणे यांचा दरारा कायम; प्रस्थापित दिग्गजांना बदलावी लागली तिकीट, वैशालीताई साधू चिकणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कुसुंबी गणात साधू चिकणे यांचा दरारा कायम; प्रस्थापित दिग्गजांना बदलावी लागली तिकीट, वैशालीताई साधू चिकणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मेढा प्रतिनिधी – कुसुंबी गणातून वैशालीताई साधू चिकणे यांचा दमदार उमेदवारी अर्ज दाखल

मेढा येथे पंचायत समिती कुसुंबी गणातून सौ. वैशालीताई साधू चिकणे यांनी आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

कुसुंबी गणात साधू चिकणे यांचा दरारा कायम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, त्यांच्या प्रभावामुळे प्रस्थापित दिग्गजांना उमेदवारीचे तिकीट बदलावे लागल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते साधू चिकणे यांनी कुसुंबी गणात राष्ट्रवादीच्या माध्यमातून केलेल्या विविध विकासकामांमुळे या ठिकाणी भाजपच्या उमेदवारास कडवे आव्हान निर्माण झाले असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

यावेळी माथाडी कामगारांचे नेते ऋषिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. बुवासाहेब पिसाळ, जावली बँकेचे संचालक श्री. चंद्रकांत गवळी, इंदवली गावचे उपसरपंच श्री. सुनील दिवडे यांच्यासह साधू चिकणे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्ज दाखल कार्यक्रमामुळे कुसुंबी गणात उत्साहाचे वातावरण असून, आगामी पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा

साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम‘आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा सातारा  प्रतिनिधी –साताऱ्याची ओळख, संस्कृती, एकतेचा अभिमान आणि

Live Cricket