महाबळेश्वर निवडणूक: उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी; एकूण ५० जण रिंगणात
महाबळेश्वर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज, बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. अंतिम दिवशी गट आणि गणांसाठी मिळून एकूण ३८ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यासह आता महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसाठी १६ आणि पंचायत समिती गणांसाठी ३४ असे एकूण ५० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
जिल्हा परिषद गटांची स्थिती
जिल्हा परिषदेच्या दोन गटांसाठी एकूण १६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. यामध्ये तळदेव गटात सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे.
▪️३४ तळदेव गट: ०९ अर्ज
▪️३५ भिलार गट: ०७ अर्ज
एकूण जिल्हा परिषद अर्ज: १६
पंचायत समिती गणांची स्थिती:
पंचायत समितीच्या चार गणांसाठी एकूण ३४ अर्ज दाखल झाले आहेत. कुंभरोशी आणि तळदेव गणांमध्ये उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.
▪️६७ कुंभरोशी गण:१० अर्ज
▪️६८ तळदेव गण:११ अर्ज
▪️मेटगुताड गण: ०५ अर्ज
▪️भिलार गण:०८ अर्ज
एकूण पंचायत समिती अर्ज:३४
राजकीय हालचालींना वेग
अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी विविध राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. आता सर्वांचे लक्ष अर्जांच्या छाननीकडे लागले असून, कोणते अर्ज वैध ठरतात आणि कोणते उमेदवार माघार घेतात, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून मतदारांमध्येही आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




