मेढ्यात शिवसेना शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन; कविता ओंबळे यांचा अर्ज दाखल
मेढा प्रतिनिधी : जिल्हा परिषद कुसुंबी गटातून आज शिवसेना शिंदे गटातून कविता एकनाथ ओंबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय आधिकारी राजश्री मोरे यांच्याकडे दाखल केला.
यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख रेश्मा जगताप, शिवसेना जिल्हा सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, माथाडी नेते ऋषीकांत शिंदे, राष्ट्रवादी चे नेते दिपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी एकनाथ ओंबळे म्हणाले ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील लोकप्रिय नेते असून त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबवल्या आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असून कुसुंबी गटातून शिवसेनेच्या उमेदवार कविता ओंबळे या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून त्यांना विभागातून जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असून या निवडणुकीत कविता ओंबळे या चांगल्या मताधिक्याने निवडून येतील यात कोणतीच शंका नाही. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते, शिवसैनिक ,महिला युवक उपस्थित होत्या.




