मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत अर्चना रांजणे यांचा अर्ज दाखल

मेढा प्रतिनिधी:जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज जिल्हा परिषद कुसुंबी गटातून सौ. अर्चना रांजणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मेढा येथे तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय आधिकारी राजश्री मोरे सार्वजनिक बांधकाममंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला.
आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या वतीने अर्चना रांजणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले, जावळी तालुक्यात केलेल्या विकासकामांच्या जोरावर भाजप चे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जावळी तालुक्यातील ५४गावांसाठी महत्वाचे असलेले बोंडारवाडी धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
जावळी तालुक्यातील विकासकामे केवळ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच करू शकतात.त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विक्रमी मताधिक्याने निवडून येणार यात कोणतीच शंका नाही.
भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे यांच्याकडे कुणबीचे प्रमाणपत्र असल्याने ते आंबेघर गणातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.मात्र

ओबीसी जन भावना लक्ष्यात घेऊन पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला असून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.अशी ग्वाही भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर धनावडे यांनी दिली.




