कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतील मुख्य आरोपी समीर गायकवाडचा मृत्यू
सांगली -ज्येष्ठ पुरोगामी नेते व विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड (वय ४३) याचा २० जानेवारी २०२६ रोजी सांगलीत मृत्यू झाला. सांगलीच्या शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर गायकवाड याला काल मध्यरात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.




