रब्बी हंगाम 2026- ई-पीक पाहणीसाठी अंतिम 6 दिवस शिल्लक शेतकऱ्यांनी पिकांची नोंद डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅपद्वारे करावी– जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा : १० डिसेंबर २०२५ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये ई- पीक पाहणी रब्बी हंगाम २०२५ सुरु करण्यात आली आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी App मधून पिकांची नोंद करणार नाहीत त्यांना कोणतेही पिकांचे संदर्भात (पीक वीमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती) अनुदान मिळणर नाही तसेच सर्व कृषी शासकीय योजनांचा लाभ घेता येणार नाही. सद्यस्थितीमध्ये रब्बी हंगाम पीक पाहणीची आकडेवारी बघता शेतकरी स्तरावरुन यास अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. शेतकरी स्तरावरुन पीकपाहणीसाठी अंतिम 6 दिवस शिल्लक राहीलेले आहेत तरी ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप पीक पाहणी केली नसेल त्यांनी दि. २४ जानेवारी २०२६ अखेर पर्यंत आपले पिकांची नोंद डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे शेतकरी लॉगिन मधुन करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
सदर हंगामी पिकांचा माहिती संच हा राज्यातील सर्व कृषक जमिनीच्या पीक पाहणी संदर्भात १००% पीक पाहणी व शेताच्या बांधावर जाऊन फोटो काढून पीक पाहणी ही या प्रकल्पाची वैशिष्टये आहेत. या दोन्ही बाबी पूर्ण होण्यासाठी राज्यभरात प्रत्येक गावात सहायकाची नेमणूक करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यासाठी एकल पिकासाठी रु. १०/- प्रति प्लॉट आणि मिश्र पिकांसाठी रु. १२/- प्रति प्लॉट इतके मानधन देखील निश्चित करणेत आले आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांचेकडील दिनांक १४ आक्टोंबर २०२४ चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार ई-पीकपाहणी साठी सहायक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, व ग्रामस्तरीय मानधनावर कार्यरत इतर विभागाचे कर्मचारी यांचेपैकी प्रत्येक गावासाठी एका सहायकाची नियुक्ती संबंधित तालुक्याचे तहसिलदार करणार आहे.




