पाचगणीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांचा वाढदिवस पाचगणी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, नगरसेवक शेखर कासुर्डे, नगरसेवक नारायण बिरामणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पाचगणी नगरपालिकेच्या शाळेतही नगराध्यक्षांनी शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.
तसेच पाचगणी शहरातील विविध राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी व व्यवसायिकांनी नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
वाढदिवसानिमित्त शहरातील विविध ठिकाणी अभिनंदन फलक लावण्यात आले असून नागरिकांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नगराध्यक्ष दिलीप (भाऊ) बगाडे यांनी मिळालेल्या प्रेमाबद्दल व शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार मानले.







