सातारा शहरातील नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय अस्वच्छ.शौचालयात लाईट पाणी याचा अभाव. नागरिक व महिलावर्ग त्रस्त
सातारा प्रतिनिधी -सातारा शहरातील विविध भागात नागरिकांच्या सोयीसाठी नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्चून शौचालय उभी केली आहेत. या शौचालय मध्ये लाईट पाणी यासह पाण्याची टाकी याची सोय ही करण्यात आली होती. परंतु कालांतराने सार्वजनिक शौचालय कडे दुर्लक्ष संबंधित विभागाचे झाल्याने ही शौचालय आता अस्वच्छतेचे ठिकाण झाले आहे. शौचालय मध्ये पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना विशेषता महिला वर्गांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषता रात्रीच्या वेळी या शौचालयात लाईटची सोय नसल्याने महिला वर्गाची मोठी अडचण होत असते. पाणीपुरवठा व लाईट या शौचालयात नसल्याने या शौचालयाचा असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती वापर करणाऱ्या नागरिकांची झाली आहे. या शौचालयाचा अनेक जण वापर करीत असल्याने त्यांना आपल्या घरातूनच पाणी व रात्रीच्या वेळी टॉर्च घेऊन जावे लागते. संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन शहरातील सर्व शौचालयांची तपासणी करून नागरिकांना त्वरित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-सातारा शहरातील सार्वजनिक शौचालयातील भिंतीवर स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत स्वच्छता गृहात पाणी भरपूर टाकून शौचालय स्वच्छ ठेवा असे फलक सर्वत्र झळकले आहेत. प्रत्यक्षात शौचालयात नळ कनेक्शन तुटलेले आहेत तसेच पाणीच उपलब्ध नाही तर शौचालय स्वच्छ कसे राहणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शौचालयात पाणी नाही नळ नाही मात्र शौचालयाच्या भिंतीवर पाणी भरपूर टाका व शौचालय स्वच्छ ठेवा असा विसंगत संदेश मात्र शौचालयाच्या भिंतीवर झळकत आहे.
स्वच्छतेचा जागर करणाऱ्या सातारा नगरपालिकेच्या नूतन कारभार पाहणाऱ्या नगरसेवकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व गोरगरीब कुटुंबातील घटकांसाठी उभारलेल्या शौचालयाची सर्व प्रकारच्या सुविधा पुन्हा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी प्रयत्न करावेत. शौचालयात पाणीपुरवठा बंद झाल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते परिणामी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.
श्रीरंग काटेकर सातारा.



