Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भावनिक निर्णय : तेजस्विनी भिलारेंनी शब्द पाळत वंदना भिलारेंना संधी दिली

भावनिक निर्णय : तेजस्विनी भिलारेंनी शब्द पाळत वंदना भिलारेंना संधी दिली

भावनिक निर्णय : तेजस्विनी भिलारेंनी शब्द पाळत वंदना भिलारेंना संधी दिली

प्रवीण भिलारे यानी केलेली बाळासाहेबांची सेवा हे आमच्यावर ऋणच; तेजस्विनी भिलारेंनी शब्द पाळला, प्रवीण भिलारे यांच्या सौभाग्यवती वंदना भिलारे यांना उमेदवारी जाहीर!”

सातारा -प्रवीण भिलारे यांनी केलेली बाळासाहेबांची सेवा त्यांना दिलेली साथ हे आमच्यावर ऋणच; या ऋणातून मुक्त होण्याची आज वेळ आली आहे या शब्दात डॉ.तेजस्विनी भिलारेंनी आपल्या भावना व्यक्त करून आपला शब्द पाळला व प्रवीण भिलारे यांच्या सौभाग्यवतीं वंदना भिलारे यांना उमेदवारी जाहीर केली!”

संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे ज्या भिलार गणाकडे लक्ष लागून राहिले होते त्या भिलार गणामध्ये आज एक ऐतिहासिक निर्णय झाला या गणा मधून कै.बाळासाहेब भिलारे यांच्या सून डॉ.तेजस्विनी भिलारे व बाळासाहेब भिलारे यांचे कार्यकर्ते प्रवीण भिलारे या पंचायत समितीच्या जागेसाठी आग्रही होते 

या दोघांमध्ये चांगलीच रसिखेच पाहायला मिळत होती या दोघांचा निर्णय मकरंद आबा यांच्या कोर्टात गेला होता, त्यावर आज तेजस्विनी भिलारे यांनी आपणास उमेदवारी मिळावी यासाठी आबांकडे आग्रह धरला त्याच प्रमाणे प्रवीण भिलारे यांनी आपली प्रबळ इच्छा व्यक्त केली होती. “मी आयुष्यभर आदरणीय बाळासाहेब भिलारे यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभा राहिलो, त्यांची मनोभावे सेवा केली. त्यामुळे यावेळेस मला संधी मिळावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.

प्रवीण भिलारे यांच्या या भावनेचा सन्मान करत तेजस्विनी भिलारे यांनी अत्यंत संवेदनशीलतेने त्यांना उत्तर दिले. “तुम्ही बाळासाहेबां साठी जे काही केले, त्याचे मोठे कर्ज आमच्या कुटुंबावर आहे. आज हे कर्ज फेडण्याची आणि तुमच्या निष्ठेचा सन्मान करण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी प्रवीण भिलारे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यासाठी डॉक्टर तेजस्विनी भिलारे यांनी मकरंद आबा यांच्याकडे कोणतेही अट किंवा कोणतीही मागणी न ठेवता हा निर्णय घेतला या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम नाहीसा झाला व आनंदाचे वातावरण तयार झाले, हा राजकारणातील एक भावनिक क्षण ठरला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा शहरातील नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय अस्वच्छ.शौचालयात लाईट पाणी याचा अभाव. नागरिक व महिलावर्ग त्रस्त

Post Views: 8 सातारा शहरातील नगरपालिकेचे सार्वजनिक शौचालय अस्वच्छ.शौचालयात लाईट पाणी याचा अभाव. नागरिक व महिलावर्ग त्रस्त  सातारा प्रतिनिधी -सातारा

Live Cricket