कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » भिलार गणात तेजस्विनी भिलारे यांच्या उमेदवारीसाठी जनलाट; ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून जोरदार मागणी

भिलार गणात तेजस्विनी भिलारे यांच्या उमेदवारीसाठी जनलाट; ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून जोरदार मागणी

भिलार गणात तेजस्विनी भिलारे यांच्या उमेदवारीसाठी जनलाट; ग्रामस्थांसह पंचक्रोशीतून जोरदार मागणी

भिलार प्रतिनिधी- सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाबळेश्वर तालुक्यामधील थंड वातावरण आता तापू लागले आहे महाबळेश्वर तालुक्याच्या वाटेला भिलार गट मधून अनुसूचित जमाती व तळदेव गटातून सर्वसाधारण असे आरक्षण पडले

त्याचबरोबर पंचायत समितीच्या गणासाठी भिलार मधून सर्वसाधारण महिला , मेटगुताड गणमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला , तळदेव गणातून सर्वसाधारण व कुभरोशी गणातून सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले.महाबळेश्वर पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भिलार गण हा ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी आरक्षित झाल्याने या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच, या जागेवर युवा नेतृत्व तेजस्विनी भिलारे यांना उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी भिलार ग्रामस्थांसह आजूबाजूच्या गावांमधून जोर धरत आहे.

लोकप्रियतेचा वाढता आलेख

भिलार हे केवळ पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध नसून राजकीयदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे मानले जाते. या गणात तेजस्विनी भिलारे यांनी गेल्या काही काळापासून सामाजिक कार्यात घेतलेला पुढाकार, महिलांचे संघटन आणि युवकांमधील त्यांची पकड यामुळे त्यांचे नाव आघाडीवर आहे. आरक्षण जाहीर होताच कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीगाठींच्या माध्यमातून त्यांच्या नावाचा जागर सुरू केला आहे.

पंचक्रोशीतील गावांचा पाठिंबा

केवळ भिलारच नव्हे, तर गणांतर्गत येणाऱ्या इतर लहान-मोठ्या गावांमधील ग्रामस्थांनीही तेजस्विनी भिलारे यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. “एक सुशिक्षित, अभ्यासू आणि जनसंपर्क असलेले नेतृत्व पंचायत समितीवर गेल्यास भिलार गणाचा चेहरामोहरा बदलेल,” असा विश्वास स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे.

डॉ.तेजस्विनी भिलारे या सामाजिक व शैक्षणिक कार्यामुळे जनसामान्या मध्ये दांडगा जनसंपर्क ,घराघरात असलेला संपर्क आणि सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती. यासाठी त्या ओळखल्या जातात त्यातच शैक्षणिक संस्था चालवत असल्यामुळे त्यांच्या हातात घालून 3000 विद्यार्थी शिकून गेले आहेत याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो व एवढा दांडगा जनसंपर्क त्यांच्या पाठीशी आहे , त्याचप्रमाणे प्रशासकीय समज सरकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य.

महिलांचे महिला बचत गट आणि इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर दिलेला भर, तरुणांच्या हाताला काम आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी असलेली तळमळ. या सर्व कौशल्याने परिपक्व व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिजे जाते

भिलार गण हा खुल्या महिला गटासाठी राखीव झाल्याने अनेक दिग्गज इच्छुक होते. मात्र, तेजस्विनी भिलारे यांच्या नावाची लाट पाहता, प्रस्थापित नेत्यांपुढे आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामस्थांच्या या ‘आरडाओरड्याची’ दखल आता वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत पक्षाची अधिकृत उमेदवारी कोणाला मिळते, याकडे संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

तेजस्विनी भिलारे यांना उमेदवारी दिल्यामुळे होणारे फायदे-

तेजस्विनी भिलारे यांना उमेदवारी जाहीर झाल्या नंतर त्यांना बिनविरोध निवडून येण्यासाठी प्रयत्न होऊ शकतो कारण कै. बाळासाहेब भिलारे यांनी महाबळेश्वर तालुक्यासाठी व महाबळेश्वर तालुक्यातल्या जनतेच्या विकासासाठी अतोनात प्रयत्न केले आहेत यासाठी बाळासाहेब भिलारे यांच्या घरातील जर उमेदवार उभा राहत असेल तर सर्वपक्षीय एकत्र येऊन त्यांच्या घरातील उमेदवाराला बिनविरोध निवडून देऊ शकतात व बाळासाहेब भिलारे यांना एक अनोखी आदरांजली वाहिली जाऊ शकते.

“भिलार गणाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला अशा नेतृत्वाची गरज आहे जे लोकांमध्ये राहून काम करेल. तेजस्विनी भिलारे या सक्षम उमेदवार असून त्यांना संधी मिळणे काळाची गरज आहे.”

— विश्वनाथ भिलारे ग्रामस्थ

राजेंद्र शेठ राजपुरे :- जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती मकरंद आबांपर्यंत पोहोचवणार असून मकरंद आबा सांगतील त्यास उमेदवाराच्या पाठीशी आम्ही राहू

नितीन दादा भिलारे :- मकरंद आबा सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल व कै.बाळासाहेब भिलारे दादा यांचे स्वप्न सहा – शून्य अशी एकतर्फे निवडणूक जिंकून कै.बाळासाहेब भिलारे दादांना श्रद्धांजली वाहू

मा. मंत्री मकरंद आबा यांनी जर संधी दिली तर त्या संधीचे सोने करून दाखवू

डॉ.तेजस्विनी भिलारे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket