कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » देश » धार्मिक » मकर संक्रांतीनिमित्त पाचगणी टॅक्सी युनियनतर्फे महापूजा, अन्नदान व सत्कार समारंभ संपन्न

मकर संक्रांतीनिमित्त पाचगणी टॅक्सी युनियनतर्फे महापूजा, अन्नदान व सत्कार समारंभ संपन्न

मकर संक्रांतीनिमित्त पाचगणी टॅक्सी युनियनतर्फे महापूजा, अन्नदान व सत्कार समारंभ संपन्न

पाचगणी प्रतिनिधी :सालाबादप्रमाणे पाचगणी टॅक्सी युनियनच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त सत्यनारायण महापूजा, भजनी मंडळाचा कार्यक्रम तसेच अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच वेळी पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.दिलीपभाऊ बगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, शॉलाम इंटरनॅशनल हायस्कूल पाचगणीचे संस्थापक श्री. साहेबराव बीरामणे, माजी नगरसेवक श्री.वसंत बिरामणे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.अजितभाऊ कासुडे, नवनिर्वाचित नगरसेवक श्री.शेखर कासुडे, श्री. नारायणशेठ बिरामणे, श्री. प्रकाशभाऊ गोळे, श्री.राजेंद्र पार्टे तसेच महाबळेश्वर व पाचगणी येथील टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन टॅक्सी युनियनचे अध्यक्ष श्री. सुनीलभाऊ पार्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रम धार्मिक, सामाजिक आणि बांधिलकीच्या भावनेतून अतिशय उत्साहात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी टॅक्सी युनियनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket