कांबळेश्वर येथे गुलाबामध्ये ‘T’ पद्धतीने डोळा बांधन्याचे प्रात्यक्षिक संपन्न
बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प अंतर्गत कांबळेश्वर येथील शेतकऱ्यांना गुलाबामध्ये ‘T’ पद्धतीने डोळा बांधणे या विषयावर सविस्तर प्रात्यक्षिक घेऊन माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन केले
शेतकऱ्यांना व्यावसायिक पध्दतीने फळझाडे आणि फुुलझाडांची रोपे कशी तयार करावीत याबद्दल मार्गदर्शन करणे हा या प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी शेतकऱ्यांना कलमासाठी योग्य खुंट आणि डोळा कसा निवडावा, डोळा कसा काढावा आणि तो खुंटावर यशस्वीरित्या बसवावा याचे सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित व प्रा. सुरेश साळुंखे तसेच डॉ. प्रा. गणेश अडसूळ, आणि विषय शिक्षक मार्गदर्शक प्रा. एस. एस. आडत यांचे कृषीकन्या कु. श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका जगताप, वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.




