कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » प्रशासकीय » मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार ; पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँ साहेबाना अभिवादन

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार ; पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँ साहेबाना अभिवादन

मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार ; पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँ साहेबाना अभिवादन

सिंदखेडराजा, दि. १२: राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे मदत व पुनर्वसन मंत्री आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी नवीन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान हे प्रेरणादायी असून या ऐतिहासिक स्थळाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेडराजा विकास आराखडा नव्याने तयार करून शासनस्तरावर मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरील सिंदखेडराजा इंटरचेंज फेज क्रमांक ७ येथे उभारण्यात येणाऱ्या बालशिवबासह राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.

याप्रसंगी आमदार मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील,महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, उद्योजक दयानंद भोसले, अॅड नाझेर काझी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket