कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाने थेट तारीख सांगत दिले आदेश

नवी दिल्ली :जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. याआधी ३० जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. त्यात आता मुदतवाढ देण्यात आलीय. आता १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. यामुळे लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून आचारसंहिता लागू होऊ शकते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात दाखल जालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मदुतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य करत मुदतवाढ दिली आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आता १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सुप्रीम कोर्टानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिलीय. तर इतर सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसंदर्भात २१ तारखेला पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाकडून १० फेब्रुवारी पर्यंत सर्व निवडणुका पार पाडू असा अर्ज कोर्टात करण्यात आला होता.

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वतयारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना निवडणूक वेळेत घेण्यासाठी आदेश दिले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही पाठवण्यात आलंय. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket