कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » माजगाव पुलासाठी 8 कोटी निधी मंजूर आ.मनोजदादा यांच्या पाठपुराव्याला यश

माजगाव पुलासाठी 8 कोटी निधी मंजूर आ.मनोजदादा यांच्या पाठपुराव्याला यश

माजगाव पुलासाठी 8 कोटी निधी मंजूर आ.मनोजदादा यांच्या पाठपुराव्याला यश

कराड उत्तर मतदारसंघातील माजगाव ता. सातारा येथे उरमोडी नदीवरील सुमारे 35 वर्षे जुन्या फरशी पुलाच्या जागी नव्या मोठ्या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे,मा.ना.शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या कडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत तब्बल 8 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 हायवे पासून माजगावला जोडणारा उरमोडी नदीवरील फरशी पूल हा 35 वर्षे जुना असून त्याची रुंदी व उंची खूपच कमी आहे.यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. पावसाळ्यामध्ये या पुलावरून पावसाचे पाणी जाते त्यामुळे पावसाळ्यात या पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद असते. या ठिकाणी मोठ्या उंचीचा एखादा पूल व्हावा ही ग्रामस्थांची मागणी गेली अनेक वर्ष होती. ग्रामस्थांची मागणी व आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याने या ठिकाणी मोठ्या पुलाची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे आंबेवाडी मत्त्यापूर खोजेवाडी या गावांना शेतीमाल वाहतूक करण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. ग्रामस्थांच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सातत्याने याबाबत मागणी केली. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने माजगाव येथे नवीन पूल उभारणीसाठी नाबार्ड योजनेतून 8 कोटी रुपयांचानिधी मंजूर केला आहे.

तसेच काशीळ ते वेनेगाव कोपर्डे नदीच्या संगमावरील पुलासाठी नाबार्ड मधून 24 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तसेच याच पुलासाठी सीआरआयएफ मधून २० कोटीचे टेंडर झाले आहे. या पुलासाठी एकूण 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.एवढ्या मोठया प्रमाणात निधी मिळाल्याने पुलाचे दर्जेदार होणार आहे.

नवीन पुलाच्या उभारणीमुळे माजगाव परिसरातील दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे.ज्याचा लाभ शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीबद्दल माजगाव व परिसरातील ग्रामस्थांनी महायुती सरकारचे, मा. ना. शिवेंद्रराजे भोसले,आमदार मनोजदादा घोरपडे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket