समाजसेवेचा वसा जपणाऱ्या सौ.आशाताई नितीन वन्ने यांचा आज वाढदिवस
पाचगणी प्रतिनिधी :पाचगणी येथील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या समाजसेविका सौ.आशाताई नितीन वन्ने यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. समता सैनिक दलाच्या त्या एक प्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्या असून, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
महिलांसाठी बचत गटांची उभारणी, महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे तसेच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात सौ. आशाताई वन्ने नेहमीच पुढाकार घेत असतात. महिलांच्या अडचणी, समस्या आणि मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
पाचगणीतील आपल्या प्रभागामध्ये नागरी सुविधा, मूलभूत प्रश्न, पाणी, रस्ते, स्वच्छता यांसह विविध मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली असून, लोकोपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी आवाज उठवणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय आणि महिला बचत गटांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




