कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » चांगला गायक होण्यासाठी चांगली गाणी ऐकणे आवश्यक गाणी मनातली कार्यक्रमामध्ये मुकुंद फडके यांचे प्रतिपादन

चांगला गायक होण्यासाठी चांगली गाणी ऐकणे आवश्यक गाणी मनातली कार्यक्रमामध्ये मुकुंद फडके यांचे प्रतिपादन 

चांगला गायक होण्यासाठी चांगली गाणी ऐकणे आवश्यक गाणी मनातली कार्यक्रमामध्ये मुकुंद फडके यांचे प्रतिपादन 

सातारा प्रतिनिधी-ज्याप्रमाणे चांगला लेखक होण्यासाठी सातत्याने चांगले वाचन करणे आवश्यक असते त्याच प्रकारे चांगला गायक होण्यासाठी सतत चांगली गाणी ऐकणे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले.येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि माय बिट्स स्टुडिओ यांच्यातर्फे आयोजित ‘गाणी मनातली’ या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष चिटणीस, काका पाटील दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, माय बिट्स स्टुडिओचे संचालक डॉक्टर लियाकत शेख,मंजिरी दीक्षित आणि सचिन शेवडे उपस्थित होते. 

मुकुंद फडके म्हणाले, कराओके यंत्रणेच्या माध्यमातून अनेकांना गाणी म्हणण्याची सुविधा जरी उपलब्ध झाली असली तरी ती एक साधना आहे. या यंत्रणेचे तंत्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. मूळ गायकांनी एखादे गाणे कशाप्रकारे गायले आहे आणि कोणत्या शब्दावर अशा प्रकारे भर दिला आहे हे पाहणे महत्त्वाचे असते. त्यासाठी कराओकेच्या माध्यमातून गायनकला सादर करणाऱ्यांनी भरपूर गाणी ऐकणे महत्त्वाचे आहे.

 हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी मध्ये गायनाचा प्रचंड खजिना आहे त्या खजिन्यातून निवडक गाणी निवडून आपल्या आवडीच्या गायकाची गाणी जरी सातत्याने ऐकली तरी एक वेगळ्या प्रकारची साधना केली जाऊ शकते. आपल्या आवडीच्या गायकाची नक्कल करण्यापेक्षा त्याने गायलेले गाणे सुरात म्हणणे महत्त्वाचे असते असेही ते म्हणाले.

 श्रीकांत कात्रे यांनी यावेळी दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या व्यासपीठाचे कौतुक केले. या व्यासपीठाच्या निमित्ताने सातारमधील सांस्कृतिक चळवळीला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यासपीठावर संगीतविषयक आणि साहित्यविषयक कार्यक्रम सातत्याने आयोजित करणारे शिरीष चिटणीस अभिनंदनास पात्र आहेत असे ते म्हणाले.

शिरीष चिटणीस यांनी भाषणामध्ये दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध सांस्कृतिक उपक्रमांची माहिती देऊन गाणी सादर करताना गाणी ऐकण्याबरोबरच वाचन भरपूर करा असा सल्ला दिला. लता मंगेशकर यांचे वाचन प्रचंड असल्याने काही गाण्यांमध्ये त्यांनी शब्दांमध्ये बदल केले ज्यामुळे ती गाणी अजरामर आहेत. दीपलक्ष्मी पतसंस्था यासाठीच सत्कार पुस्तके देऊन करते असेही त्यांनी नमूद केले.काका पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये या उपक्रमाचे कौतुक केले. 

या कार्यक्रमाचे संयोजक आणि संचालक डॉक्टर लियाकतशेख होते. त्यांच्या व्यतिरिक्त या कार्यक्रमामध्ये सीमा राजपूत, मंजिरी दीक्षित, कमल लोंढे, श्रुती शहा, गणेश शिंदे, गायत्री देशपांडे, वैशाली पांढरे, मीनाक्षी मांडवे, दिपाली गीते, आशुतोष देशपांडे, संजोग इथापे, उमाकांत पाटील,जलील शेख, अनिल भोसले, किरण कोरे यांनी गाणी सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गीते यांनी केले. धनी व्यवस्था अक्षता शेवडे व सचिन शेवडे यांनी सांभाळली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket