कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » लो-वॅल्यू प्लास्टिकला नवे आयुष्य : पाचगणीतील सिडनी पॉईंटवर अभिनव उपक्रम,सुविधांचे लोकार्पण पाचगणीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

लो-वॅल्यू प्लास्टिकला नवे आयुष्य : पाचगणीतील सिडनी पॉईंटवर अभिनव उपक्रम,सुविधांचे लोकार्पण पाचगणीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

लो-वॅल्यू प्लास्टिकला नवे आयुष्य : पाचगणीतील सिडनी पॉईंटवर अभिनव उपक्रम,सुविधांचे लोकार्पण पाचगणीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणित हिलदारी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनी पॉईंट, पाचगणी येथे रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बेंच, पेविंग ब्लॉक व फेन्सिंगचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात पार पडले. 

या उपक्रमांतर्गत एकूण ०२ बेंच, १०० पेक्षा अधिक पेविंग ब्लॉक तसेच सुरक्षिततेसाठी आवश्यक फेन्सिंग बसवण्यात आली असून, यासाठी १५० किलोपेक्षा अधिक लो-वॅल्यू प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यात आला आहे. कचऱ्यात जाणारे व पर्यावरणाला घातक ठरणारे हे प्लास्टिक उपयुक्त सार्वजनिक सुविधांमध्ये रूपांतरित केल्याने हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या सुविधांमुळे सिडनी पॉईंटवर येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना बसण्याची सोय उपलब्ध झाली असून, आकर्षक अशी गॅलरी व सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाचे सौंदर्य वाढण्यासोबतच पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होणार आहे. 

या सुविधांचे लोकार्पण पाचगणीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, सुप्रिया माने, आकाश बगाडे, राजश्री सणस, परवीन मेमन, माधुरी कासुर्डे, अमित कांबळे, स्वाती कांबळे व शिल्पा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. पंडित पाटील, आरोग्य विभाग प्रमुख स्वाती पाटील, शहर समन्वयक ओंकार ढोले, सुनील सनबे, स्वच्छता मुकादम विकी चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिलदारीचे डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी रिसायकल प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बेंच, पेविंग ब्लॉक व फेन्सिंगची संकल्पना, प्रक्रिया व त्यामागील पर्यावरणीय महत्त्व याबाबत उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली. 

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिलदारीचे दीपक मदने, गणेश शेडगे, दिपाली धनवडे, प्राजक्ता बोडरे, अस्मिता कासुर्डे व निखील खरात यांनी विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम म्हणजे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत स्वच्छता, शाश्वत पर्यटन आणि पर्यावरणपूरक विकास यांचा उत्कृष्ट संगम असून, भविष्यात अशा आणखी उपक्रमांच्या माध्यमातून पाचगणी शहर अधिक स्वच्छ, सुंदर व पर्यावरणस्नेही करण्याचा संकल्प नगरपरिषद व हिलदारी अभियानाने व्यक्त केला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket