नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव अग्रणी असलेल्या नितीन वन्ने यांचा आज वाढदिवस

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव अग्रणी असलेल्या नितीन वन्ने यांचा आज वाढदिवस

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव अग्रणी असलेल्या नितीन वन्ने यांचा आज वाढदिवस 

पाचगणी (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष मा. नितीन वन्ने यांचा आज ६ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा होत आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणारे आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून नितीन वन्ने यांची सातारा जिल्ह्यात ओळख आहे.

लोकनेते भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या नितीन वन्ने यांनी समाजकारणाचा वसा जपत जिल्ह्यातील अनेक सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कामगारांचे प्रश्न, अन्यायग्रस्त घटकांचे मुद्दे तसेच प्रशासनाशी संबंधित अडचणी सोडवताना त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या नितीन वन्ने यांना समाजकारणाची ओढ लहानपणापासूनच होती. त्यांचा साधेपणा, लोकांशी असलेली आपुलकी आणि कार्यातील प्रामाणिकपणा यामुळे पाचगणीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात ते विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या माध्यमातून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, हक्कांसाठी व न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. जनतेमध्ये सहज मिसळून त्यांच्या समस्या समजून घेणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा दृढ झाली आहे. शिक्षणाच्या बाबतीत नेहमी ते अग्रेसर असतात. पाचगणी शहरात त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यात महत्त्वाचा सहभाग असतो. सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवण्यासाठी त्यांची भूमिका आग्रही असते.

नितीन वन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket