Home » राज्य » शिक्षण » राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा राजपुरी ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा

राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा राजपुरी ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा

राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत २ जानेवारी रोजी जिल्हा परिषद आदर्श शाळा राजपुरी ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा

पाचगणी प्रतिनिधी –राजपुरी येथील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा (ज्ञानमंदिर) च्या नवीन भव्य व प्रशस्त इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्याला राजेंद्रशेठ राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मेहनतीला आणि स्वप्नांना या भूमिपूजनाच्या निमित्ताने नवी दिशा मिळत आहे. भावी पिढीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.

या मंगल आणि शुभदायी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राजपुरी सर्व ग्रामस्थ तसेच पालकवर्ग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजपुरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket