विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा नगरपरिषदेत भाजपाची निर्विवाद सत्ता अमोल मोहितेंचा पदभार सोहळा उत्साहात संपन्न वाई नगरपालिका भाजपाच्या ताब्यात; दीपकदादा ननावरे ठरले विजयाचे सूत्रधार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मांढरदेव श्री क्षेत्र काळूबाईदेवीची यात्रा सुरक्षित वातावातावरणात पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करा- जिल्हाधिकारी संतोष पाटील पाचगणीच्या विकासाचे शिल्पकार नानासाहेब कासुर्डे यांचा अमृतमहोत्सव उत्साहात
Home » राज्य » विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

सातारा -कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथे खा.नितीन काका पाटील व आ. मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते 2 कोटी 10 लाख रुपयेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीच्या माध्यमातून विकास कामास निधी उपलब्ध करू अशी ग्वाही खा. नितीन पाटील यांनी दिली यावेळी आ.मनोजदादा घोरपडे, चित्रलेखा माने कदम ताई,संपत दादा माने, अण्णासाहेब निकम, भीमराव काका पाटील, विकास राऊत, सुनील अण्णा मलवडकर, विष्णुपंत कणसे, तात्यासो साबळे, सुरेश बापू भोसले, ऋषिकेश तुपे, सचिन बेलागडे, राजेंद्र घाडगे, दीपक शिंदे, हनमंतराव भोसले, भरत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

        यावेळी बोलताना खा. नीतीनकाका पाटील म्हणाले महायुतीच्या माध्यमातून आज पर्यंत विकासाला चालना दिली असून इथून पुढे सुद्धा या विभागाच्या विकासासाठी सदैव आपणा सोबत असेन.

         यावेळी बोलताना आ. मनोजदादा घोरपडे म्हणाले आमदारकीला एक वर्ष पूर्ण होत असताना जास्तीत जास्त शेतीला पाणी कसे देता येईल यासाठी काम केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने पाल इंदोली उपसा सिंचन योजना, समर्थगाव, काशीळ, गणेशवाडी उपसा सिंचन योजना,हणबरवाडी धनगरवाडी सिंचन योजना, टेंभू सिंचन योजनेतून शामगाव म्हासुर्णे व अन्य गावांचा समावेश आहे. कराड उत्तर मधील प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी देणे हे माझे टार्गेट असून त्या दृष्टीने माझे काम चालू आहे. कोरेगाव तालुक्यातील जिहे कठापूर योजनेमधून जायगाव, काटेवाडी, कन्हेरखेड,अपशिंगे, अंभेरी या गावांना पाणी मिळालेले आहे. नागझरी गावास पाणी आरक्षित करून मिळाले असल्यामुळे तेथील मुळीकवाडी व आर्वीचा काही भाग यांना पाणी मिळणार आहे. धनगरवाडी टप्पा क्रमांक दोन च्या माध्यमातून साठेवाडी, आर्वीचा काही भाग मोहितेवाडी या गावांना पाणी मिळणार आहे. उर्वरित गावांना पाणी देण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने सर्वेक्षणाचे काम चालू केले आहे लवकरच आपल्या सर्वांना आनंदाची बातमी मिळेल आणि आपल्या हक्काचे पाणी मिळेल. शेती पाण्याबरोबरच शेतकऱ्यांना वीज, शेत रस्ते यासाठी भरीव काम करण्याचा मानस यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी बोलून दाखवला. कराड उत्तर च्या सर्वांगीण विकासासाठी कायम तत्पर असून विकास कामास कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

        यावेळी सुरेश बापू भोसले, तात्यासो साबळे,भीमराव काका पाटील,आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विनायक जाधव, सुप्रिया पवार,राजू मोरे, सुहास निकम, सतीश भोसले, विकास अण्णा गायकवाड,प्रवीण भोसले, विघ्नेश पवार,महेश उबाळे, सुरेश थोरात, विश्वनाथ भोसले,भगवान कदम,डॉक्टर मनीष कुमार जंगम, युवराज घाडगे, शंकर कणसे, तुषार जाधव,दिलीप कदम,किशोर गायकवाड,नारायण पवार, शिवाजी निकम,नारायण साबळे, श्रीकांत फडतरे,नामदेव कणसे, सयाजी कणसे, नामदेव सावंत, पोपट घाडगे, अंकुश पवार, राजेंद्र भोसले यासह गावातील परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ऋषिकेश तुपे यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक साबळे यांनी आणि आभार विनायक जाधव यांनी मानले.

अभेरी,बेलेवाडी, वेळू,पवारवाडी,जयपूर,पिंपरी, कोंबाडवाडी व आर्वी चा उर्वरित भाग यांना जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेमधून पाणी उपलब्ध करून देणार

 आमदार मनोजदादा घोरपडे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न

Post Views: 70 विकास कामास निधी देणार खा.नितीन पाटील पिंपरी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व नागरी सत्कार कार्यक्रम संपन्न सातारा

Live Cricket