शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पमुदतीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
सातारा प्रतिनिधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून तसेच अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अल्पमुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अल्पमुदतीच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांनी आपली https://tinyurl.com/2s3zy24p या लिंकवर आपली माहिती भरावी.
सदर प्रशिक्षण हे मागणी आधारित स्वरूपाचे असून उद्योगांना आवश्यक असलेली प्रगत व आधुनिक कौशल्ये उमेदवारांना प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील युवक-युवतींची रोजगार व स्वयंरोजगाराची क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, एस. टी. स्टॅण्डजवळ, सातारा दूरध्वनी: (०२१६२) २३९९३८ / ८३०८३८३६३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.



