कास परिसरातील हॉटेल्सना वन विभागाचा इशारा-जंगल क्षेत्रात कचरा टाकल्यास होणार कारवाई
सातारा-कास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल असून या हॉटेलचा कचरा जंगल क्षेत्रात टाकण्याचे प्रमाण वाढले असून यावर प्रतिबंध आणण्यासाठी सर्व हॉटेल व्यवसायिकांना वनविभाग सातारा परिमंडळ रोहोट यांचेवतीने नोटीस देण्यात आली असून जंगल क्षेत्रात कचरा टाकल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा रोहोट परिमंडळाचे वनपाल राजाराम काशीद यांनी दिला आहे.
कास पठार परिसरात जंगल क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने काही हॉटेल व्यवसाय त्यांच्याकडील प्लास्टिक कचरा व इतर कचरा सरळ सरळ जंगलात आणून टाकून देतात यामुळे जंगली प्राण्यांच्या अन्नसाखळीत बाधा निर्माण होऊ शकते हा कचरा वन्य प्राणी खात असून त्यामुळे त्यांच्या आरोग्यवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




