कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » निवृत्तीवेतनासाठी हयातीचे दाखले 31 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे सातारा कोषागाराचे आवाहन

निवृत्तीवेतनासाठी हयातीचे दाखले 31 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे सातारा कोषागाराचे आवाहन

निवृत्ती वेतनासाठी हयातीचे दाखले 31 डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे सातारा कोषागाराचे आवाहन

सातारा – सातारा जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या ज्या निवृत्तीवेनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांनी माहे नोव्हेंबर 2025 मध्ये बँकेमध्ये हयातीच्या दाखल्यावर स्वाक्षरी केलेली नाही. किंवा ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र दाखला दिलेला नाही, अशा निवृत्तीवेनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांनी दि.31 डिसेंबर पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, सातारा येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून हयातीचा दाखला सादर करावा किंवा ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र दाखला भरावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे यांनी केले आहे. 

 जे निवृत्तीवेतनधारक ऑनलाईन जीवनप्रमाणपत्र सादर करणार आहेत त्यांनी सर्व माहिती बरोबर भरली गेली असलेबाबत स्वतः खात्री करावी. निवृत्तीवेतनधारक, कुटूंबनिवृत्तीवेतनधारक दि.31 डिसेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करणार नाहीत त्यांचे या कारणामुळे निवृत्तीवेतनाचे प्रदान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे हयातीचे दाखले विहीत वेळेत सादर करावेत असे आवाहन श्रीमती नांगरे यांनी केले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket