शालोम इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाचगणीचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा
पाचगणी प्रतिनिधी — थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी हे देश व राज्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणूनही ओळखले जाते. पाचगणी येथील आयसीएसई बोर्डशी संलग्न असलेली शालोम इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ही नामांकित शिक्षण संस्था असून येथे तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेचा वार्षिक क्रीडा दिन दि. २० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वायुसेनेचे स्क्वॉड्रन लीडर श्री. संधीर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच किसनवीर कॉलेज, वाई येथील एनसीसी विभागप्रमुख श्री. समीर पवार यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध कवायत व आकर्षक परेड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेचे संस्थापक श्री. साहेबराव बिरामणे, चेअरमन श्री.अजित बिरामणे व ऍडमिनिस्ट्रेटर सौ. श्वेता बिरामणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले क्रीडाकौशल्य प्रभावीपणे सादर केले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरीत्या पार पडला. शाळेचे प्राचार्य श्री.शशिकांत विचारे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.





