Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » निष्ठावंतांना डावलल्याचा फटका; वाईत राष्ट्रवादी पिछाडीवर, भाजप मजबूत

निष्ठावंतांना डावलल्याचा फटका; वाईत राष्ट्रवादी पिछाडीवर, भाजप मजबूत

निष्ठावंतांना डावलल्याचा फटका; वाईत राष्ट्रवादी पिछाडीवर, भाजप मजबूत

सातारा (अली मुजावर )वाईत राष्ट्रवादीची पीछेहाट; भाजपाची ताकद वाढली, अजितदादा गटासाठी चिंतेचा इशारा समजला जात आहे. वाई,खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व मंत्री मकरंदआबा पाटील यांनी महाबळेश्वर व पाचगणी नगरपालिकांमध्ये सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिल्याने नगराध्यक्ष पदाची माळ अनुक्रमे महाबळेश्वरचे सुनील शिंदे व पाचगणीचे दिलीपभाऊ बगाडे यांच्या गळ्यात पडली. या निर्णयामुळे जनसेवेची संधी तळागाळातील कार्यकर्त्यांना मिळाल्याचे चित्र दिसून आले.

मात्र वाईसारख्या महत्त्वाच्या नगरपालिकेमध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाची झालेली पीछेहाट ही राजकीयदृष्ट्या चिंताजनक बाब ठरली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याचे वाई नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालातून स्पष्ट झाले आहे.

या संधीचा फायदा भाजपने अचूकपणे उचलत माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांना उमेदवारी देत वाई शहरातील भाजप गट अधिक सक्रिय केला. परिणामी वाई नगरपालिकेत भाजपाचे दहा नगरसेवक निवडून येत भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात ताकद दाखवत अजितदादा राष्ट्रवादी गटाचे पानिपत घडवून आणले आणि भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात निर्णायक भूमिका बजावली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मंत्री मकरंदआबा पाटील कोणता आक्रमक पवित्रा घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वाई–खंडाळा–महाबळेश्वर तालुक्यात भाजपाची वाढती ताकद अजितदादा पवार गटासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे सध्याच्या राजकीय समीकरणातून स्पष्ट होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 21 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket