मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानात कासवंड येथे स्वच्छता व वृक्षारोपणाला महिलांचा पुढाकार
पांचगणी प्रतिनिधी -मुख्यमंत्री समृध्द ग्राम अभियानांतर्गत कासवंड येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करण्यात आले.या योजनेत कासवंड गाव सहभागी झाले असुन गावातील परीसर पानंद रस्ते व प्रत्येक घराघराच्या परीसरातील साफसफाई करण्यासाठी पुरुषमंडळीना सोबत घेऊन महिलांनीच पुढाकार घेत गावच्या सर्वांगीन विकासाला प्रारंभ केला आहे.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेतील स्पर्धेत आंम्ही सहभागी झालो असुन प्रथम बक्षीस मिळो अथवा न मिळो परंतू यातून स्वच्छतेची सवय सर्वांनाच लागेल व लोकांचे आरोग्य चांगले राहील ही आमची अपेक्षा आहे. असे मत ग्रामपंचायत सदस्य प्रियांका गणेश पवार म्हणाल्या.

या अभियान बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सी. आर पी सौ. निताताई गावडे, कृषीसखी सौ. विद्या पवार, कांचन पवार, पार्वती पवार, लक्ष्मी पवार, शोभा उंबरकर, सुजाता पवार तसेच ग्रामसेवक. रविकांत सपकाळ, सरपंच जनार्दन चोरमले, उपसरपंच रमेश पवार, सदस्य विश्वास गोळे, वृक्षमित्र सर्जेराव पवार, कॅप्टन दिलीप पवार, आनंदा पवार, तुकाराम पवार, काशिनाथ पवार ग्रामस्थ उपस्थितीत होते.




