Home » Uncategorized » महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती

महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती

महाबळेश्वर नगराध्यक्षपदी सुनील शिंदे; मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाला मतदारांची पसंती

महाबळेश्वर -महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शिंदे यांनी १४५१ मतांच्या निर्णायक फरकाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह महाबळेश्वर नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट व मजबूत सत्ता प्रस्थापित झाली असून, शहराच्या राजकारणात महत्त्वाचा बदल घडून आला आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान झालेल्या मतमोजणीत प्रत्येक फेरीत चुरशीचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र सुरुवातीपासूनच सुनील शिंदे यांनी आघाडी घेतली होती. पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी अधिक मजबूत होत गेली आणि अखेर १४५१ मतांच्या स्पष्ट फरकाने त्यांचा विजय निश्चित झाला.

या ऐतिहासिक विजयामागे माजी आमदार मकरंद पाटील, किसन शेठ शिंदे, D. L. शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाचा निर्णायक वाटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. संघटनात्मक ताकद, योग्य नियोजन आणि कार्यकर्त्यांची एकजूट यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हे यश मिळाल्याचे मानले जात आहे.13 राष्ट्रवादीचे नगरसेवक यावेळी महाबळेश्वर नगरपालिकेमध्ये निवडून आले आहेत.

निकाल जाहीर होताच शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी एकमेकांचे पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले.

विजयानंतर बोलताना नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी मतदारांचे आभार मानत, “महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून पर्यटन, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि नागरी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाईल,” असे आश्वासन दिले.

दरम्यान, या निकालामुळे महाबळेश्वर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता स्थापन झाली असून, येणाऱ्या काळात शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे

Post Views: 25 सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेचा गड जिंकला; दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणार – मंत्री जयकुमार गोरे सातारा :

Live Cricket