Home » देश » महाबळेश्वरवासियांचे स्वप्न पूर्ण करणार : कुमारभाऊ शिंदे

महाबळेश्वरवासियांचे स्वप्न पूर्ण करणार : कुमारभाऊ शिंदे

महाबळेश्वरवासियांचे स्वप्न पूर्ण करणार : कुमारभाऊ शिंदे

महाबळेश्वरला जागतिक नकाशावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करणार : कुमार शिंदे 

महाबळेश्वर : भारतात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वर देशपातळीवर प्रसिद्ध आहेच. येथील वातावरणावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. पर्यटन वाढले तर स्थानिकांना रोजगाराला चालना मिळेल. त्यासाठी राज्य शासनाच्या मदतीने मोठे पर्यटन प्रकल्प राबवले जातील. महाबळेश्वरला जागतिक पर्यटन स्थळांच्या नकाशावर नेण्याचे महाबळेश्वरवासियांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मला द्यावी, अशी भावनिक साद कुमारभाऊ शिंदे यांनी मतदारांना घातली. 

गिरिस्थान नगर विकास आघाडी (नियोजित) तर्फे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे व त्यांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना कुमारभाऊ शिंदे बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, बाजारपेठेचे सुशोभीकरण करताना व्यापाऱ्यांची चार फूट घरे, दुकाने जाणार होती. मी तात्काळ मुंबईला जाऊन या नेत्यांच्या निदर्शनास ही बाब आणली. त्यांनी हा निर्णय तात्काळ बदलला. स्थानिकांच्या पोटापाण्याचा विचार न करणारा विकास काय कामाचा? विकास करताना लोकांचे नुकसान होता कामा नये. लोकांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी लोकांच्या बाजूने उभा राहणारा हा कुमारभाऊ शिंदे आहे. 

बाजारपेठेच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करावयाचा आहे. त्या कामाला देखील मी मंजुरी आणली आहे. वनविभागाच्या आडमुठेपणामुळे वेण्णालेक येथील व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. परंतु लवकरच या लोकांचे त्याच जागी मी पुनर्वसन करणार आहे. जागतिक पर्यटन स्थळांच्या नकाशात महाबळेश्वरला स्थान मिळवून देणार आहे. या नगरीच्या विकासाचा संपूर्ण आराखडा आमच्याकडे तयार आहे. येणाऱ्या काळात तो मूर्त स्वरूपात आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. महाबळेश्वरच्या विकासासाठी मला जनतेचे पाठबळ पाहिजे. यासाठी उद्याच्या २० तारखेच्या निवडणुकीत मतदारांनी मी व माझ्या सहकाऱ्यांची पाठराखण करावी, असे आव्हान त्यांनी नागरिकांशी बोलताना केले. 

विरोधकांकडे कोणताही विकास आराखडा नाही. तो तयार करण्याची दृष्टीच नाही. नुसते राजकारण करून कधी समाजाचा विकास होत नाही. तर समाजकारणाला प्राधान्य देऊन विकास केला तरच समाजात प्रगती होते. महाबळेश्वरचे अर्थकारण हे पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे अधिकाधिक पर्यटक महाबळेश्वरकडे कसे येतील यावर आमचा भर राहणार आहे. जागतिक पर्यटन स्थळाच्या नकाशात महाबळेश्वरला स्थान आम्ही मिळवून देणार. त्यामुळे केवळ देशीच नव्हे तर परदेशी पर्यटकांची वर्दळ महाबळेश्वरमध्ये वाढेल. त्यामुळे भविष्यात येथील स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. असा विश्वासही कुमारभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 30 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket