कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » Uncategorized » निधन वार्ता » निधन वार्ता » काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. आज १२ डिसेंबर सकाळी साडे सहाच्या सुमारास लातूर येथील त्यांच्या देवघर या निवासस्थानी वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे ते आजारी होते. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत होते.

शिवराज पाटील चाकूरकर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्याशिवाय यांनी देशातील अनेक उच्चपदावर काम केले आहे. केंद्रीय राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. २००४ ते २००८ या काळात शिवराज पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. त्याशिवाय लोकसभेचे ते अध्यक्षही राहिले आहेत. केंद्रात संरक्षण, वाणिज्य, विज्ञान तंत्रज्ञान, नागरी उड्डाण, पर्यटन यासारखी इतर मंत्रि‍पदे त्यांनी भूषवली आहेत. २०१० ते २०१५ या काळात पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून त्यांनी कार्य केले.

मूळचे लातूरच्या चाकूरमधील रहिवासी असलेले शिवराज पाटील चाकूरकर हे मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील एक प्रभावी काँग्रेस नेते होते. लातूर मतदारसंघावर त्यांची पकड मजबूत होती. त्यामुळेच एक दोनदा नव्हे तर तब्बल ७ वेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांचा पराभव झाला परंतु काँग्रेसने त्यांचा अनुभव पाहता राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. महाराष्ट्रासह देशातील दिग्गज नेते असणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं राज्यासह देशातील राजकारणात मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाबाबत काँग्रेससोबत सर्वच राजकीय पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी दु:ख व्यक्त केले.

शिवराज पाटील चाकूरकर हे देशाचे गृहमंत्री असताना २००८ साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. २६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी प्राण गमावले. वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. या हल्ल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. त्यावेळी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत ३० नोव्हेंबर २००८ रोजी त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय स्तरावर अनेक मंत्रि‍पदे, राज्यपालपद असा शिवराज पाटील चाकूरकर यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket