साताऱ्यात भीषण अपघात; इलेक्ट्रिक दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. इलेक्ट्रिक दुचाकीवरील २८ वर्षीय सारिका सुतार (रा. संगममाहुली, सातारा) या महिलेचा ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शफीक पठाण यांच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अनेक वाहने महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूने बेकायदेशीरपणे पार्क केली जातात. त्यामुळे रस्ता अत्यंत अरुंद होऊन वाहनांना वळण घेणे कठीण जाते. अनेकदा या वाहनांमुळे अपघाताचे प्रसंग उद्भवले आहेत.




