कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » प्रशासकीय » सांडवली रस्त्यावरील दोन पुलांसाठी ९ कोटी ६६ लाख ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

सांडवली रस्त्यावरील दोन पुलांसाठी ९ कोटी ६६ लाख ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा

सांडवली रस्त्यावरील दोन पुलांसाठी ९ कोटी ६६ लाख
ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; दळणवळण सुरक्षित आणि सुकर होणार

सातारा- दुर्गम, डोंगराळ भागातील दळणवळण अधिक सुकर, सुरक्षित आणि निर्धोक होण्यासाठी विविध रस्त्यांवरील पुलांच्या बांधकामाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्राधान्य दिले आहे. सातारा तालुक्यातील प्रजिमा २९ ते सांडवली रस्त्यावर नवीन दोन पूल बांधण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून ९ कोटी ६६ लाख ७३ हजार रुपये निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला असून प्रमुख जिल्हा मार्ग २९ ते सांडवली या रस्त्यावर सा.क्र. ३/९९० येथील पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ४७ लाख ४४ हजार आणि सा.क्र. ५/२५० येथील पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी १९ लाख २९ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. सांडवली रस्त्यावर पावसाळ्यात पांगारे तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे येथील रस्ता वारंवार खचणे, रस्त्याची पडझड होणे आदी घटना घडून दळणवळण ठप्प होणे तसेच सांडवली व भागातील गावांचा संपर्क तुटणे, या प्रकारामुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित ठिकाणी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आता निधी मंजूर झाला असून या भागातील ग्रामस्थांची गैरसोय कायमची दूर होणार आहे.
दरम्यान, मंजूर कामांची निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करा, मंजूर काम तात्काळ सुरु करून काम दर्जेदार करा तसेच वेळेत पूर्ण करा, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket