Home » राज्य » प्रशासकीय » आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन

पाचगणी प्रतिनिधी -पांचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि हिल्दारी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त आंतरशालेय भव्य पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व शाळांना या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, यासाठी त्यांच्या शाळांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हिल स्टेशनच्या संरक्षण व संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि स्वच्छ, हिरवे व जबाबदार पांचगणी घडविण्यासाठी त्यांच्या सृजनशील कला कल्पनांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. पर्यावरण संवर्धनाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये दृढ करण्यासाठी कला हा प्रभावी मार्ग असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

स्पर्धेमध्ये विद्यार्थी पर्वत संरक्षण, कचरा व्यवस्थापन, जबाबदार पर्यटन आणि स्वच्छता यांसारख्या विषयांवर आपल्या पोस्टरमधून प्रभावी संदेश मांडण्याबाबत आवाहन करण्यात आले असून सदर उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबाबत सजग आणि सक्रिय भूमिका घेणारे जबाबदार नागरिक तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे सुद्धा मिळणार आहेत.

स्पर्धेचे विषय:

• आपल्या पर्वतांचे संरक्षण – स्वच्छ व शाश्वत भविष्याकरिता हिल स्टेशन

• कचऱ्याचे वर्गीकरण करा, पर्वतांचे रक्षण करा

• ग्रीन हिल्स, क्लीन हिल्स

शहरातील सर्व शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिका व हिलदारी मार्फत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल.अधिक माहितीसाठी हिलदारी श्री. दीपक मदने (मो. ९८५००९८३०३) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 38 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket