महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाचगणीत अभिवादन
पाचगणी – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (६ डिसेंबर) रोजी पाचगणी येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा.नगराध्यक्षा सौ. लक्ष्मीताई कराडकर, माजी उपनगराध्यक्ष संतोषभाऊ कांबळे, माजी नगरसेवक श्री. प्रवीणशेठ बोधे, श्री. अभिजीत सोनावले (बांधकाम विभाग), रविंद्र कांबळे, विनायक येवले, नितीन मर्ढेकर, अभिषेक राजपूरे, तानाजी कासुर्डे, सुनील महाडिक, अशपाक पठाण, नासिर शेख, बशीर पटवेकर, अशोक बागडे, रोहित मोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.




