Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » धन्वंतरी कुटुंबप्रमुख डॉ.रविंद्र भोसले यांचे वाढदिनानिमित्त आकर्षक समृध्दी ठेव योंजना कार्यान्वित

धन्वंतरी कुटुंबप्रमुख डॉ.रविंद्र भोसले यांचे वाढदिनानिमित्त आकर्षक समृध्दी ठेव योंजना कार्यान्वित

धन्वंतरी कुटुंबप्रमुख डॉ.रविंद्र भोसले यांचे वाढदिनानिमित्त आकर्षक समृध्दी ठेव योंजना कार्यान्वित

सातारा -सहकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्टात्त आदर्शवत व सक्षम असलेल्या धन्वंतरी नागरी सह.पतसंस्थेमध्ये धन्वंतरी कुटुंबप्रमुख संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले सरांचा वाढदिवस समारंभ उत्साहात पार पडला

धन्वंतरी देवतेचे पुजनाने समारंभाची सुरूवात झाली. समारंभाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी संचालक डॉ. सुनिल कोडगुले यांनी उत्तमरित्या सांभाळली. सदर प्रसंगी उत्सवपुर्तीचा सत्कार सर्व संचालक मंडळ व सेवक वगनि केला व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेने सभासदांचे कल्याणासाठी ना नफा ना तोटा तत्वावर अत्यल्प दरामध्ये रूगणवाहीका सुविधा कार्यान्वित केली तसेच आकर्षक व्याजदराची धन्वंतरी समृध्दी ठेव योजना सुरू केली व सन २०२६ च्या आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

याप्रसंगी बोलताना व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांनी ९% व्याजदराची १८ महिने मुदतीची आकर्षक व अभिनव अशी समृध्दी ठेव योजना तसेच अल्पमुदतीची १५ दिवसाची ६% व्याजदराची मागणी ठेव योजना कार्यान्वित केल्याचे जाहीर केले. तसेच सभासदांकरीता व सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून अत्यल्प दरामध्ये रूग्णवाहीका सुविधाही कार्यान्वित करत असल्याचे सांगितले. तसेच सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांचे मागील सेवाकालातील कामकाजाचा आढावा घेवून संस्थेच्या वाढीसाठी व उत्कर्षासाठी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पुर्ननियुक्ती करीत असल्याचे जाहीर केले. तसेब ३०० कोटीचे वर व्यवसायपूर्ती झाल्याप्रसंगी सभासदांचे आर्थिक उन्नतीसाठी अत्यल्प दरामध्ये गृहकर्ज, वाहनकर्ज, विनातारण कर्ज, सोने तारण कर्ज इ. सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच मा. संचालक मंडळाने सेवकांची १०% पगारवाढीची मागणी असतानाही त्यांची कार्यकुशलता व संस्थेमधील योगदानाचे आधारावर २०% पेक्षा जास्त वेतनवाढ जाहीर केली आहे..

सदर प्रसंगी बोलताना धन्वंतरी कुटुंबप्रमुख संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले, आपण सर्वानी दिलेल्या शुभेच्छाबददल हार्दिक आभार मानतो आपणां सर्वाच्या सहकायनि धन्वंतरी पतसंस्था राज्यात प्रथम कर्माकाची सक्षम पतसंस्था झाली आहे याचा आनंद होत आहे. तसेच वाढदिवसानिमित्त मा. संचालक मंडळाने विविध योजना करून धन्वंतरी कुटुंबाला आगळावेगळी भेट दिली आहे याबददल आभारी आहे. तसेच सहकार भुषण धन्वंतरी पतसंस्थेच्या या उत्तुंग भरारीमध्ये सेवकांचा सिंहाचा वाटा आहे व संचालक मंडळाने केलेल्या भरघोस पगारवाढीबाबत समाधान व्यक्त करून सर्व सेवकांनी यापुढेही प्रतिवर्षी दिलेली उदिदष्टे १००% पूर्ण कराचीत असे सांगितले. तसेच वाढदिवसानिमित्त संचालक मंडळ, सेवक वर्ग, सभासद व ठेवीदार यांनी दिलेल्या शुभेच्छांबददल सर्वांचे आभार मानले.

संस्थेचे सर्व संचालक विश्वस्ताच्या धावनेने पारदर्शक व्यवहार करत आहेत व सेवकही सभासदांना विनम्र सेवा देवून संस्थेच्या वाढीसाठीच सतत काम करीत आहेत. यामुळे स्थापनेपासून संस्थेला सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळत आहे यापुढेही त्यांनी असेच काम करुन संस्थेचा नावलौकीक हा महाराष्टातच नाही तर पूर्ण देशात वाढवावा असे त्यांनी यावेळी सांगीतले व पतसंस्था वाढीस गोलाचे सहकार्य करणा या संचालक सभासद ठेवीदार व सेवक वर्गाचे आभार मानले. संस्था सामाजिक बांधीलकीचे जाणीवेतून विविध कार्यक्रम राबवित आहे त्याचाच एक भाग म्हणून माझे हस्ते रूग्णवाहीकेचे उदघाटन केलेबददल त्यांनी संचालक मंडळाचेही आभार मानले व वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्काराबदद्ल कृतज्ञता व्यक्त केली.

सदर प्रसंगी संचालक डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. जयदीप बव्हाण, डॉ. नारायण तांबे, अॅड. सुर्यकांत देशमुख, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिगणे, सह. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका मुरूमकर, सभासद व सेवक वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 56 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket