Home » राज्य » शेत शिवार » ग्राहकांनी GI टॅग पाहूनच महाबळेश्वर स्ट्रॉबेरी खरेदी करावी — नितीनदादा भिलारे

ग्राहकांनी GI टॅग पाहूनच महाबळेश्वर स्ट्रॉबेरी खरेदी करावी — नितीनदादा भिलारे

ग्राहकांनी GI टॅग पाहूनच महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी खरेदी करावी — नितीनदादा भिलारे

महाबळेश्वर/भिलार — महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादनाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी कैलासवासी बाळासाहेब भिलारे यांनी महाबळेश्वर च्या स्ट्रॉबेरी ला GI टॅग मिळवून दिला , असे मत नितीन भिलारे यांनी व्यक्त केले.

स्ट्रॉबेरी ग्रोथ असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे म्हणाले, “GI टॅग मिळाल्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. ब्रिटिश काळापासून या परिसरात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. मात्र, बाजारात इतर तालुक्यातील स्ट्रॉबेरीला ‘महाबळेश्वर स्ट्रॉबेरी’ म्हणून विकले जाते, हे चुकीचे आहे.”

ते पुढे म्हणाले, “महाबळेश्वर तालुक्यातील मूळ स्ट्रॉबेरी तिच्या उत्कृष्ट गुणवत्तेसाठी जगभर ओळखली जाते. हीच गुणवत्ता ग्राहकांपर्यंत पोहोचावी, यासाठी जीआय टॅगचे पालन होणे गरजेचे आहे.”

नितीन भिलारे यांनी स्पष्ट मत व्यक्त केले की, ज्या तालुक्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन होते, त्या ठिकाणच्या नावानेच त्या स्ट्रॉबेरीची विक्री व्हावी.

श्रीराम विकास सेवा सोसायटी आणि श्रीराम फळ प्रक्रिया उत्पादन यांच्यामार्फत उत्पादित स्ट्रॉबेरीला आता अधिकृत GI टॅगची बॅग लावली जाणार आहे.

“ग्राहकांनी ‘महाबळेश्वर अस्सल स्ट्रॉबेरी’ची खरी चव चाखायची असेल, तर GI टॅग असलेली स्ट्रॉबेरीच खरेदी करावी,” असे आवाहन स्ट्रॉबेरी उत्पादकांनी केले आहे.

बाजारपेठेत महाबळेश्वर तालुक्या मधून जाणारी स्ट्रॉबेरी हे फक्त जीआय टॅग असलेली स्ट्रॉबेरी असणार आहे इतर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांनी जर महाबळेश्वर ची स्ट्रॉबेरी म्हणून बाजारपेठेत स्ट्रॉबेरी विक्री केल्यास आम्ही त्यांना कायदेशीर बाबीने उत्तर देऊ व वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन ही करण्यात येईल असे प्रतिपादन नितीन भिलारे यांनी केले.सदर बैठकीला महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेतकरी उपस्थित असून या शेतकऱ्यांना नितीन भिलारे प्रवीण शेठ भिलारे राजेंद्र आबा भिलारे विश्वनाथ भिलारे आदींनी मार्गदर्शन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह.

Post Views: 38 महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक: दुपारपर्यंत २९.०७ टक्के मतदान; केंद्रांवर मतदारांचा उत्साह. महाबळेश्वर (प्रतिनिधी):महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५

Live Cricket