उद्योजक किरण शिवाजी बाबर — जनसंपर्क, जिद्द आणि कार्यकर्तृत्वाचा आदर्श वाढदिवस विशेष
सातारा — सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या किरण शिवाजी बाबर यांनी आपल्या कष्टाळू स्वभावाने आणि योग्य मार्गदर्शनाच्या आधारावर उद्योजकतेच्या क्षेत्रात भक्कम पाय रोवले. वडील व बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यवसायाचे प्राथमिक धडे आत्मसात केले. काही काळ पत्रकारितेपासून सुरुवात करून, पुढे विविध दैनिकांमध्ये काम करताना त्यांनी समाजजीवन, लोकसंपर्क आणि व्यवस्थापनाचा अमूल्य अनुभव मिळवला.
याच अनुभवाचा उपयोग करून त्यांनी पाचवड येथे ‘भैरवनाथ टेक्स्टाईल’ या आधुनिक व सर्व सुविधा असलेल्या कपड्यांच्या शोरूमची स्थापना केली. शूटिंग, साड्या, लहान मुलांचे ड्रेसिंग अशा सर्व प्रकारच्या अध्यावत डिझाईन्स आणि दर्जेदार कलेक्शनमुळे भैरवनाथ टेक्स्टाईल अल्पावधीतच परिसरातील विश्वासार्ह ब्रँड ठरले आहे.
घरातून आलेली धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी जपत किरण बाबर सामाजिक कार्यातही सदैव पुढे असतात. विविध उपक्रम, मदतकार्य, सामाजिक कार्यक्रमात त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील आणि लोकाभिमुख उद्योजक म्हणून निर्माण झाली आहे. प्रचंड जनसंपर्क, विस्तृत मित्रपरिवार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते नेहमी सर्वांच्या संपर्कात राहतात.
त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे अनेकांनां रोजगाराच्या संधी प्राप्त केल्या असून, स्थानिक तरुणांना व्यवसायाच्या नव्या दिशा दाखवण्याचे काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्य घरातून आलेल्या किरण बाबर यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या उद्योजक किरण शिवाजी बाबर यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!त्यांच्या आयुष्याचा पुढील प्रवास अधिक यशस्वी, समृद्ध आणि प्रेरणादायी ठरो, हीच सदिच्छा.




