सातारा नगरपालिका निवडणूक 2025 : प्रभाग 13 मधील कोपरासभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा – नगरपालिका निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 येथे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार स्नेहल अशोक तपासे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरासभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सभेस मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. प्रभागातून बिनविरोध निवड झालेले बाळासाहेब खंदारे यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सातत्यपूर्ण कामांसाठी जनतेने मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले नेतृत्वास बळकटी देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी विनोद कुलकर्णी आणि समृद्धी जाधव यांनीही प्रभावी भाषणे करत उमेदवारांच्या विकासनिष्ठ भूमिकेवर प्रकाश टाकला. प्रभागातील नागरिकांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे निवडणूक प्रचाराला मोठी चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले.




