मुंबई – मराठा बिझनेसमन कॉन्क्लेव्हमध्ये ‘सक्सेस अबॅकस सातारा’ला जरांगे पाटील यांची भेट.नेहरू सेंटर, वरळी येथे मराठा बिझनेसमन कॉन्क्लेव्ह फोरमतर्फे आयोजित कार्यक्रमात सक्सेस अबॅकस सातारा या देशातील सर्वोत्कृष्ट अबॅकस प्रशिक्षण संस्थेच्या स्टॉलला विशेष मान्यता मिळाली.
या प्रसंगी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्टॉलला भेट देऊन संस्थेच्या उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी सक्सेस अबॅकस सातारा करत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे सीईओ किरण पाटील उपस्थित होते. त्यांनी अबॅकस प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये, विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रगती आणि संस्थेचे उपक्रम याबाबत माहिती दिली.कॉन्क्लेव्हमध्ये संस्थेच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची दखल घेतली.





