Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » NCC विद्यार्थ्यांचा सहभाग—साताऱ्यात वन विभागासोबत भव्य स्वच्छता अभियान

NCC विद्यार्थ्यांचा सहभाग—साताऱ्यात वन विभागासोबत भव्य स्वच्छता अभियान

NCC विद्यार्थ्यांचा सहभाग—साताऱ्यात वन विभागासोबत भव्य स्वच्छता अभियान

साताऱ्यात NCC विद्यार्थी व वन विभागाचा संयुक्त स्वच्छता अभियान — ६५ छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सातारा प्रतिनिधी –उपवनसंरक्षक कार्यालय सातारा आणि वनपरिक्षेत्र कार्यालय सातारा येथे संयुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील NCC विद्यार्थ्यांनी वन विभागासोबत सहभाग नोंदवत परिसरातील मोठ्या प्रमाणातील कचरा गोळा करून स्वच्छतेबाबत जनजागृतीचा संदेश दिला.

या उपक्रमात कॅप्टन डॉ. केशव पवार, केअरटेकर प्रा. निलेश गदळे, PI (Hav) सचिन देशमुख, तसेच NCC मधील ज्युनियर ऑफिसर ओंकार शिंदे, अमेय देशमाने, दुर्गा खामकर, दिशा खामकर, सार्जंट राजकुमार राठोड, देवदास जाधव, सौरभ काळे, सानिका अडसूळ, निशा दाखले, वैष्णवी सनस यांच्यासह एकूण ६५ छात्र सैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

स्वच्छता मोहिमेदरम्यान वन विभागाच्या आवारात साचलेला प्लास्टिक, कागद, साहित्य व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. विद्यार्थी आणि वन कर्मचारी यांनी मिळून कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून सांगितले.

वन विभाग आणि NCC विद्यार्थ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सातारा वनपरिक्षेत्र कार्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला असून, या उपक्रमामुळे युवकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती अधिक बळकट होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 46 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket