Home » देश » जय फाउंडेशनच्या कार्याचा अनुभव, प्रभाग १९ च्या विकासाला नवा वेग — हेमलता सागर भोसले

जय फाउंडेशनच्या कार्याचा अनुभव, प्रभाग १९ च्या विकासाला नवा वेग — हेमलता सागर भोसले

जय फाउंडेशनच्या कार्याचा अनुभव, प्रभाग १९ च्या विकासाला नवा वेग — हेमलता सागर भोसले

सातारा -सातारा नगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार अजिंक्यताऱ्याच्या पूर्व बाजूस नव्याने तयार झालेल्या प्रभाग क्रमांक १९ मधील विकास कामांना गती देणे हे आपले प्रमुख ध्येय असल्याचे महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार हेमलता सागर भोसले यांनी सांगितले. प्रभागातील सर्वसामान्यांच्या मूलभूत समस्या ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार असल्याची हमी त्यांनी दिली.

भोसले म्हणाल्या, “ही केवळ माझी उमेदवारी नाही, तर या प्रभागातील विकास कामांना योग्य न्याय देण्यासाठी आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी एका सर्वसामान्य महिलेला मिळालेली संधी आहे. गेली पाच वर्षे जय फाउंडेशनच्या माध्यमातून सागर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात मी सातत्याने कार्यरत आहे.”

महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, कचरा गाडीची समस्या, पिण्याच्या पाण्याची अडचण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, परिसरातील स्वच्छता—या सर्व विषयांवर प्राधान्याने काम करून नागरिकांना दिलासा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागातील महत्त्वाच्या सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये शाहूनगरमधील सुमित्राराजे हाउसिंग सोसायटी, गणेश हाउसिंग सोसायटी, जगतापवाडी परिसर, श्रीधर स्वामी सोसायटी, गुरुकृपा सोसायटी अशा अनेक विभागांमध्ये नागरिकांनी मांडलेल्या अडचणींचा लौकरात लवकर निपटारा करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून खंबीरपणे प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही हेमलता भोसले यांनी व्यक्त केला.

प्रभाग १९ मध्ये नव्याने समोर आलेल्या विकासाच्या गरजांवर त्यांनी दाखवलेले प्राधान्य आणि सातत्याने केलेल्या कामामुळे त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 46 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket