Home » राज्य » प्रशासकीय » महाबळेश्वर पालिका निवडणूक 2025 : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभाविकासाचा रोडमॅप

महाबळेश्वर पालिका निवडणूक 2025 : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभाविकासाचा रोडमॅप

महाबळेश्वर पालिका निवडणूक 2025 : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभाविकासाचा रोडमॅप

महाबळेश्वर -महाबळेश्वर पालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून, भाजपच्या उमेदवारांसाठी राज्याचे महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आज महाबळेश्वरमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. सकाळी ११ वाजता उदय हॉटेल येथे ही सभा आयोजित करण्यात आली असून, याबाबतची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र कुंभारदरे यांनी दिली.

पत्रकारांशी संवाद साधताना कुंभारदरे म्हणाले की, “मागील आठ-दहा वर्षांत महाबळेश्वर पालिकेचा लक्षणीय विकास झाला नाही. पर्यटननगरी असलेल्या महाबळेश्वरची तुलना इतर पर्यटनस्थळांशी केली तर हे शहर आजही खूप मागे आहे. ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी महाबळेश्वरकरांची निराशाच केली आहे.”

कुंभारदरे यांच्या म्हणण्यानुसार, महाबळेश्वर शहरासाठी विकासाची प्रचंड संधी असून, राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आगामी काळात उपलब्ध होणार आहे. “शहराचा चेहरा बदलण्यासाठी महत्त्वाचे निर्णय लवकरच घेतले जातील,” असेही त्यांनी नमूद केले.

लीजहोल्ड मिळकतीतील माळी-कामगारांचा प्रश्न चर्चेत महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सभेत महाबळेश्वरच्या प्रमुख नागरी समस्यांवर चर्चा होणार आहे. विशेषतः लीजहोल्ड मिळकतींमध्ये काम करणाऱ्या माळी-कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.

काही ठिकाणी मिळकतधारकांकडून माळी-कामगारांना बेदखल करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या प्रकरणांमध्ये सरकारमार्फत कोणते उपाय करता येतील? कोणत्या पद्धतीने त्यांना कायदेशीर अभय देता येईल? या सर्व मुद्द्यांवर मंत्री आज चर्चा करणार आहेत.यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वरमध्ये भाजपचे तीन उमेदवार रिंगणात या निवडणुकीत भाजपने महाबळेश्वरमधून तीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत –

रविंद्र कुंभारदरे – प्रभाग ३

अश्विनी ढेबे – प्रभाग १०

मनिष मोहीते – प्रभाग १०

हे तिघेही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आगामी सभेमध्ये मंत्री बावनकुळे हे तिन्ही उमेदवारांसाठी प्रचार करणार असून, महाबळेश्वरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कुंभारदरे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket