महाबळेश्वर नगरपालिका निवडणूक – प्रभाग ४ मध्ये ‘डबल एन्ट्री’, विकास विरुद्ध स्थानिक लोकप्रियता आणि भाऊ–भाऊ संघर्षामुळे प्रचंड रंगत
महाबळेश्वर (प्रतिनिधी)महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ हा सर्वात जास्त चर्चेत असलेला हॉटस्पॉट ठरला आहे.
कुमार शिंदे यांनी नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवक पदासाठीही प्रभाग ४ मधूनच अर्ज दाखल करून दुहेरी एन्ट्री घेतली आहे. यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.मुन्नव्वर हौसिंग सोसायटी हा कुमार शिंदे यांचा पारंपरिक बालेकिल्ला.गेल्या कार्यकाळात त्यांनी येथे
• रस्ता बांधकाम,
• पाणीपुरवठा लाईन,
• लाईट वीज व्यवस्था,
• अंतर्गत रस्त्यांचे काम
ही महत्त्वाची प्रश्न सोडवून मजबूत विकासाची छाप उमटवली आहे. त्यामुळे त्यांना या प्रभागात ठोस पायाभूत आधार मिळत आहे.मात्र या मुकाबल्यात दुसरे केंद्रबिंदू आहेत विमल बिरामणे. स्थानिक रहिवाशांमध्ये त्यांचा जास्त पसंतीचा चेहरा म्हणून उल्लेख होत असून,विशेषतः महिला मतदारांचा मोठा कल बिरामणे यांच्याकडे झुकलेला दिसत आहे.
त्यांचा घरगुती संवाद, शांत स्वभाव आणि कुटुंबांशी असलेले घनिष्ठ संबंध यामुळे प्रभागात त्यांचे लोकमत अधिक मजबूत होत आहे.याचवेळी या प्रभागातून कुमार शिंदे यांचे सख्खे भाऊ किरण शिंदे देखील रिंगणात उतरले आहेत.राष्ट्रवादीकडून संजय कदम, लोकमित्र जनसेवा आघाडीकडून बाळकृष्ण साळुंखे,
राष्ट्रवादीचे वंदना ढेबे, तसेच मुंबईतील शर्मिला वाशिवले या उमेदवारांमुळे स्पर्धा चौकोनी न राहता बहुमितीय बनली आहे.नगराध्यक्ष + नगरसेवक अशा दुहेरी उमेदवारीमुळे, विकासाच्या मुद्द्यांसोबतच स्थानिक लोकप्रियता आणि “भाऊ विरुद्ध भाऊ” अशा थेट लढतीने प्रभाग ४ फुल रणांगण बनले आहे.




