प्रभाग क्रमांक १३ मध्ये अपक्ष उमेदवार सोनिया शिंदे यांचा बोलबाला : जनतेनेही दिला एकमुखी पाठींबा
सातारा : सातारा नगरपालिकेच्या रणधुमाळीला आता जोर चढू लागला असून प्रभागात आता बहुरंगी लढती होणार ह्या स्पष्ट झाले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधील लढतीकडे सर्वात जास्त लक्ष असून या प्रभागातील प्रभाग क्रमांक 13 ब मधून बाळासाहेब खंदारे हे बिनविरोध झाल्याने प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये महिलांची समोरासमोर लढत होणार आहे यामध्ये अपक्ष असलेल्या सोनिया संतोष शिंदे यांचे पारडे जड मानले जात असून जनतेने देखील त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवला आहे. मनोमिलनातील उमेदवार चुकल्याने लोकांनी हा निर्णय घेतल्याची सध्या या परिसरात चर्चा आहे.
गेल्या दहा वर्षापासून सोनिया शिंदे यांनी या प्रभागात अनेक काम केले आहेत त्यामध्ये कोरोना काळातील कामाचा लेखाजोखा हे प्रभागातील जनता स्वतःहून बोलून दाखवत आहेत. कोरोना काळात लोकांना वेळेवर उपचार मिळवून देणे,लसीकरण करणे तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे अशा रुग्णांना घरपोच ऑक्सिजन मशीन मिळवून देणे ही आरोग्यसेवा जनता अद्याप विसरलेले नसून त्यांच्या सर्वच कुटुंबातील लोकांनी आपलेपणाने केलेल्या रुग्णसेवेची पोच पावती म्हणून जनता आता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याच दिसू लागला आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत देखील मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेऊन आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून सोनिया शिंदे यांनाच निवडून द्यायचा निर्धार केला आहे त्यामुळे मनोमिलनाच्या उमेदवारावरा विरोधात सोनिया शिंदे यांनी तगडे आव्हान उभे करून आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
त्यांनी केलेल्या इतर कामाचा लेखाजोखा देखील नागरिक स्वतःहून बोलून दाखवत आहेत त्यामध्ये महिलांसाठी केलेल्या विविध कार्यक्रम,महिला मेळावे,प्रभागातील वृक्षारोपण,आरोग्य शिबिरे तसेच इतर समाज उपयोगी काम करून सोनिया शिंदे या नेहमीच जनतेत मिळून मिसळून राहिल्या आहेत सोनिया शिंदे ह्या उच्चशिक्षित देखील असल्याने आपल्या प्रभागाचा उमेदवार हा उच्चशिक्षित असावा जनतेत मिळून मिसळून राहणारा असावा जनतेचे प्रश्न ऐकून घेणार असावा जनतेच्या बरोबरीने चालणारा असावा अशीच अपेक्षा प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांची असल्याने या सर्व अपेक्षांना सोनिया शिंदे ह्या पात्र ठरत असल्याने जनतेने देखील त्यांना आता पाठबळ देऊन निवडून आणण्याचे ठरवलं आहे.त्यामुळे येत्या दोन तारखेला सोनिया शिंदे यांच्याच पारड जड झाल्याचं पाहायला मिळणार आहे.




