प्रभाग क्रमांक १३ मधून सोनिया शिंदे यांनी फोडला प्रचाराचा नारळ उच्चशिक्षित उमेदवार म्हणून प्रभागातील जनता एकमुखी सोनिया शिंदे यांच्या पाठीशी
सातारा- नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून प्रभागात उमेदवारांनी आपला प्रचार वेगाने सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील प्रभावी आणि उच्चशिक्षित असलेल्या उमेदवार सौ सोनिया संतोष शिंदे यांनी देखील आपल्या प्रचाराचा नारळ फोडून झंजावती प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कामाच्या जोरावर त्या या निवडणुकीला सामोरे जात असून त्या उच्चशिक्षित तसेच जनतेत मिसळणाऱ्या उमेदवार म्हणून चांगल्यात प्रचलित आहेत. त्यामुळे जनतेने आता आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवला आहे. जनतेच्या एकमुखी पाठिंबावर आता सोनिया संतोष शिंदे प्रभाग क्रमांक 13 मधून सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी नुकताच सुरू केलेल्या प्रचार शुभारंभाला प्रभागातील शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यांनी केलेला विकास कामाच्या जोरावरच आता त्या जनतेसमोर जात असून जनता देखील त्यांना आपला उमेदवार म्हणून स्वीकारू लागले आहेत. सध्या प्रभाग 13 मध्ये महिला उमेदवार म्हणून त्यांच्याच कामाचा आणि उमेदवारीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.




