नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांचा अर्ज छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत दाखल
सातारा (अली मुजावर )साताऱ्यात आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत असून, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री. अमोल मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाच्या नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांचे अर्जही विधीपूर्वक दाखल करण्यात आले.
अर्ज दाखल कार्यक्रमानंतर आयोजित बैठकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच माता-भगिनी यांच्याशी संवाद साधण्यात आला. आगामी निवडणुकीची रणनीती, संघटनात्मक बळकटीकरण आणि साताऱ्याच्या विकासाभिमुख दृष्टीकोनाबाबत सविस्तर चर्चा झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत साताऱ्याच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी एकजुटीने, दृढ संकल्पाने आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे जाण्याचा निर्धार अधिक मजबूत झाल्याचे पदाधिकारींनी नमूद केले.




