Home » ठळक बातम्या » आरोग्य » सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये यकृत निदान व चिकित्सा शिबीर

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये यकृत निदान व चिकित्सा शिबीर 

सातारा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये यकृत निदान व चिकित्सा शिबीर 

सातारा, दि. १७ : सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये पांचभौतिक चिकित्सक डॉ. स्वप्नील सुहास जोशी यांच्या लिव्हर (यकृत) केअर सेंटर तर्फे बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी यकृत निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये एकाच छताखाली सर्व चाचण्या, तपासण्या व तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असल्यामुळे लिव्हर आणि आजारी रुग्णांना या सेवेचा लाभ घेण्याची संधी डॉ. स्वप्नील जोशी व सातारा डायग्नोस्टिक सेंटर यांनी उपलब्ध केली आहे. बुधवारी होणाऱ्या शिबिराचे उद्घाटन ‘मास’चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्या हस्ते व पोट विकार तज्ञ डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. सुहास जोशी, सातारा हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक व चेअरमन डॉ. सुरेश शिंदे, सीईओ विक्रम शिंदे, डॉ स्वप्निल जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. 

 शिबिरात यकृताची तज्ञ वैद्यांकडून तपासणी करून मोफत आयुर्वेदिक निदान व सल्ला तसेच माफक दरात औषधे देण्यात येणार आहेत. रक्त –लघवी तपासणी ५०% सवलतीत करण्यात येईल. गरजेनुसार सिटीस्कॅनच्या फी मध्येही मोठी सूट मिळणार आहे. शिबिर सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत चालेल. अधिक माहितीसाठी ९१६८४३२४३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Live Cricket