Home » ठळक बातम्या » बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; निधनाच्या अफवांवर कुटुंबियांचा खुलासा

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; निधनाच्या अफवांवर कुटुंबियांचा खुलासा

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; निधनाच्या अफवांवर कुटुंबियांचा खुलासा

बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची सोशल मीडियावर पसरलेली बातमी खोटी (अफवा) असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी आणि टीमने स्पष्ट केले आहे. 

श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांचे सतत लक्ष आहे.

८९ वर्षीय धर्मेंद्र यांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवल्याची अफवा वेगाने पसरली, ज्यामुळे चाहते आणि कलाविश्वात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सनी देओल यांच्या टीमने त्वरित निवेदन जारी करत ही अफवा फेटाळून लावली. त्यांनी सांगितले की, “धर्मेंद्रजींची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. कोणत्याही प्रकारच्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका.” त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी देखील चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

कुटुंबीय आणि कलाकारांची रुग्णालयात धाव

धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची बातमी मिळताच, त्यांच्या मुलींना तातडीने अमेरिकेतून बोलावण्यात आले होते. याशिवाय, त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक बॉलिवूड कलाकार त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले यात सलमान खान, शाहरुख खान, आणि गोविंदा यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. धर्मेंद्र यांच्यावर सलमान खान यांचे विशेष प्रेम होते. त्यामुळे सलमान खान आपले शूटिंग अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल झाले. प्रसिद्ध अभनिते सनी देओल, बाॅबी देओल हे त्यांचे पुत्र असून त्यांना अभिनेत्री इशा देओल ही मुलगी आहे.

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळख

धर्मेंद्र हे बाॅलीवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाते. धर्मेंद्र यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. रोमँटिक भुमिकांसह थ्रीलर चित्रपटातही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या शोलेसारख्या गोल्डन ज्युब्ली चित्रपटामुळे ते प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. धर्मेंद्र यांचे गाजलेले चित्रपटात ‘शोले’ , ‘फूल और पत्थर’, आणि ‘चुपके चुपके’ यांसारख्या क्लासिक चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजलेल्या आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा”

देश प्रथम! मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी रद्द केला लंडन-पॅरिस दौरा” मुंबई-देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता

Live Cricket