कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात साताऱ्याच्या अस्मितेला सुरेल सलाम’आम्ही सातारी’ गीताचा मंगळवारी शाहू कलामंदिरात भव्य प्रकाशन सोहळा कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी ‘NBAGR’ कडून विशेष सन्मान  कुंभरोशी गणात ‘कमळ’ फुलणार? सामाजिक कार्याचा वारसा अन् दांडगा अनुभव असलेले सुरेश जाधव रिंगणात! गौरीशंकर सुखात्मे स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे रसिक प्रेक्षकांकडून झाले कौतुक  लढायचं परिवर्तनासाठी, लढायचं विकासासाठी! – श्री. सुभाष महादेव सोंडकर यांना भाजपची अधिकृत उमेदवारी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » पुस्तक जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट व्हावे — प्रा.राजा दीक्षित यांचे आवाहन

पुस्तक जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट व्हावे — प्रा.राजा दीक्षित यांचे आवाहन

पुस्तक जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट व्हावे — प्रा.राजा दीक्षित यांचे आवाहन

सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूर्व ग्रंथ महोत्सवाचा समारोप — वाचन संस्कृती संवर्धनावर मान्यवरांचे विचार

सातारा-महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरी, जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती आयोजित ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपूर्व ग्रंथ महोत्सव  याचा समारोप सोमवारी (दि. १० नोव्हेंबर २०२५) दुपारी तीन ते पाच या वेळेत उत्साहात पार पडला. समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे मराठी विश्वकोश मंडळ, वाईचे माजी अध्यक्ष प्रा.राजा दीक्षित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रकांत दळवी यांनी भूषविले.

कार्यक्रमाला सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह श्री. शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष प्राचार्य वि.ना. लांडगे  कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, मुख्य समन्वयक आर.पी. निकम, समन्वयक सुनीता कदम, सहसमन्वयक प्रल्हाद पारटे तसेच प्राचार्य प्रमोदिनी मंडपे व संतोष लाड  आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

 “ग्रंथ हेच जीवनाचे सार” — प्रा. राजा दीक्षित

समारोप प्रसंगी बोलताना प्रा. राजा दीक्षित म्हणाले,

 “महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरीत उभे राहणे म्हणजे एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री येण्यासारखे आहे. मराठी भाषेत विज्ञानकथेची परंपरा रुजविण्यात जयंत नारळीकर यांनी अपूर्व कार्य केले आहे. ज्यांच्या हातात ग्रंथ नाहीत त्यांची अवस्था पशुसमान होते.”

ते पुढे म्हणाले, “आज मूल्यहीन समाजकारण आणि अर्थकारण वाढत चालले आहे. समाजातील ‘कोयतेशाही’ वाढत असताना, मुलांच्या हातात कोयत्याऐवजी ग्रंथ गेले पाहिजेत, हीच खरी समाजाची जबाबदारी आहे. वाचाल तर वाचाल’* ही केवळ घोषणा नसून आजची सामाजिक गरज बनली आहे.”

किंडल आणि ई-बुकच्या युगातही पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी म्हटले,

> “कृत्रिम फुल आणि ताज्या फुलात जसा फरक असतो, तसाच फरक ग्रंथ आणि ई-बुकमध्ये आहे. पुस्तक हे हाताळण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे; ते आत्म्याला स्पर्श करते.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देत ते म्हणाले,

“त्यांची विद्वत्ता विलक्षण होती आणि त्यांचे ग्रंथप्रेम अद्वितीय होते. प्रत्येक गाव ‘पुस्तकांचे गाव’ झाले पाहिजे. शासनाने त्यासाठी प्रोत्साहन द्यावे, तसेच ‘पुस्तक’ या गोष्टीचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करावा*, अशी माझी शासनाकडे विनंती आहे.”

“साहित्य हे समाजाचे आरसे आहे” — डॉ. चंद्रकांत दळवी

अध्यक्षस्थानावरून बोलताना *डॉ. चंद्रकांत दळवी* म्हणाले,

 “९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्राध्यापकांनी सतत लिहायला व बोलायला पाहिजे. आम्ही ‘रयत मासिक’ सुरू केले असून, त्याद्वारे विचारवंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.”

ते पुढे म्हणाले, “ग्रंथ महोत्सव हा विचारांचा मेळावा आहे. वाचकांचा वाढता प्रतिसाद हे कौतुकास्पद आहे. माझे लिखाण प्रशासकीय असते, त्यात साहित्यिक स्पर्श कमी असला तरी, साहित्य समाज घडवते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य यामध्ये साहित्याची मुशाफिरी घडते. सोशल मीडियावर सशक्त साहित्य कसे देता येईल यावरही चर्चा व्हावी.”

“वाचन वाढले की लेखन दर्जेदार होते” — तुषार दोशी

*पोलीस अधीक्षक तुषार दोशी* म्हणाले,

> “वाचन झाल्याशिवाय दर्जेदार लेखन होत नाही. जेव्हा नवनव्या अनुभूती पेलण्याची ताकद येते, तेव्हा भाषेचे सौंदर्य वाढते. जितके अधिक वाचन होईल तितकी मराठी भाषा समृद्ध होईल.”

### 🌷 “साताऱ्याचा ग्रंथ महोत्सव म्हणजे विचारांची पर्वणी” — डॉ. यशवंत पाटणे

*डॉ. यशवंत पाटणे* म्हणाले,

> “ग्रंथ महोत्सवामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात वाचनाची गोडी निर्माण झाली आहे. साताऱ्याचा कंदी पेढा जसा प्रसिद्ध आहे, तसाच हा ग्रंथ महोत्सवही प्रसिद्ध झाला आहे. अंधार चिरण्याचे सामर्थ्य फक्त विचारवंताकडे आणि ग्रंथाकडे असते. पुस्तकाची आवड हीच आपली सांस्कृतिक ओळख आहे.”

### 📚 “वाचक वाढला तर समाज जागृत होईल” — शिरीष चिटणीस

कार्यवाह *शिरीष चिटणीस* यांनी सांगितले,

> “कमी खर्चात सातत्याने होत असलेला हा ग्रंथ महोत्सव सातारकरांसाठी वरदान आहे. वाचक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, आणि विद्यार्थी वर्ग हा या महोत्सवाचा आत्मा आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे, हीच आपली अपेक्षा आहे.”

### 🏆 सांस्कृतिक कार्यक्रमांतून विद्यार्थी गौरव

या प्रसंगी विविध विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळाला. प्राथमिक विभागात जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल*, गोकुळ प्राथमिक शाळा, आबासाहेब चिरमुले विद्यामंदिर* या शाळांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
तर माध्यमिक विभागात *भवानी विद्यामंदिर*, लोकमंगल हायस्कूल MIDC कोडोली*, आणि सातारा कन्या विद्यामंदिर करंजे* यांना प्रथम तीन क्रमांक मिळाले.
या विजेत्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *राजकुमार निकम* यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

कुडाळ गटात भाजपच्या सौ जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात

कुडाळ गटात भाजपच्या सौ. जयश्रीताई गिरीचां प्रचाराचा झंझावात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा विश्वास सार्थ ठरवत विजयश्री खेचून आणणार सातारा:जावली तालुक्यात

Live Cricket